Mumbai Crime : परप्रांतीय भाजीविक्रेत्याची मुजोरी; लघुशंकेस विरोध केल्याने पोलिसावर केला चाकू हल्ला

मुंबईत पुन्हा एकदा परप्रांतीय भाजी विक्रेत्याची मुजोरी पाहायला मिळाली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News : मुंबईत पुन्हा एकदा परप्रांतीय भाजी विक्रेत्याची मुजोरी पाहायला मिळाली आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील परिसरात उघड्यावर लघुशंका करण्यास विरोध केल्याने एका भाजीविक्रेत्याने पोलिसावर हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली आहे.या चाकू हल्ल्यात पोलीस जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Urfi javed : उर्फी जावेदला बलात्काराची धमकी देणारा अटकेत; कोण आहे ती व्यक्ती?

राम गोंडे (वय ४१ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर अनेक फेरीवाले व्यवसाय करत आहेत यापैकीच एक असलेल्या परप्रांतीय भाजीविक्रेता राम गोंडे हा लघुशंकेसाठी सार्वजनिक शौचालयात न जाता तेथेच रस्त्यावर लघुशंका करू लागला. यावेळी तेथून अनेक महिला देखील ये जा करत होत्या.

त्याचवेळी पोलीस कर्मचारी (Mumbai Police)  उदय कदम हे देखील तेथून जात होते. त्यांनी त्याभाजी विक्रेत्याला उघड्यावर लघुशंका करू नकोस अन्यथा तुझ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे सांगितले. मात्र, त्यानंतर भाजी विक्रेता आणि पोलीस उदय कदम यांच्यात भांडण सुरू झाले. भाजी विक्रेता राम गोंडे याने त्याच्याजवळ असणारा भाजी साफ करण्याचा चाकू घेऊन कदम यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कदम यांच्या हाताला जखम झाली.

Mumbai Crime News
Beed Crime News: ग्रामपंचायत निकालानंतर गावात वाद; सोशल मीडियावरुन ३०२ करण्याची धमकी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा

घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी राम गोंडे याला अटक केली. भादंवि कलम ३५३, ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या उदय कदम यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे समजते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com