Vanraj Andekar Death Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Vanraj Andekar Death: आधी गोळीबार, नंतर कोयत्याने सपासप वार; माजी नगरसेवकाच्या हत्येचा थरार CCTV मध्ये कैद

Pune Crime News: वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी ३ जणांना अटक केली. माजी नगरसेवकाच्या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar Death) यांची रविवारी हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करत हत्या केली. वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी मास्टरमाईंड सौम्या गायकवाडला अटक केली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ३ जणांना अटक केली. माजी नगरसेवकाच्या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये रविवारी ही घटना घडली. त्यांच्यावर गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या जयंत कोमकर आणि गणेश कोमकर या दोघांनी त्यांची हत्या केली. या दोघांना देखील पोलिसांनी अटक केली. पण वनराज यांच्या हत्येमागचा खरा मास्टरमाईंड सोम्या गायकवाड आहे हे तपासातून समोर आले.

पूर्ववैमनस्य आणि प्रतिस्पर्धी संघर्षातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. वनराज यांच्या हत्येनंतर मास्टरमाईंड सोम्या गायकवाड हा फरार झाला होता. वनराज आंदेकरच्या हत्येची दीड ते दोन महिन्यापासून तयारी सुरू होती. सोम्यापूर्वी वनराज आंदेकर टोळीमध्ये सक्रीय होते. आंबेगाव पठार परिसरातील पोरांचा वनराजचा गेम करण्यासाठी वापर केल्याची प्राथामिक माहिती तपासातून उघड झाली आहे. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने सोम्या गायकवाडला टेंभुर्णी परिसरातून अटक केली.

वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणई सोमनाथ कोमकर, जयंत कोमकर, सोमनाथ गायकवाड या तीन जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दोन आरोपींना विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकाने अटक केली. १३ ते १४ जणांनी वनराज यांच्यावर हल्ला केला. मात्र वनराज गोळीबारात नाही तर धारधार शस्त्राने हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्य आणि प्रॉपर्टीमधून झालेल्या वादातून त्यांची हत्या झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra Bus Accident : अमर यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

SCROLL FOR NEXT