Hadapsar Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने सावकाराचं भयानक कृत्य, पतीसमोरच केला पत्नीवर अत्याचार, पुण्यातील संतापजनक घटना

Hadapsar Police: उसने पैसे पती परत देऊ शकला नाही म्हणून सावकाराने हे भयानक कृत्य केले आहे.

Priya More

Pune News: पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या (Pune Crime) धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशामध्ये आता पुण्यामध्ये खासगी सावकाराने एका महिलेवर तिच्या पतीसमोर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उसने पैसे पती परत देऊ शकला नाही म्हणून सावकाराने हे भयानक कृत्य केले आहे. या सावकाराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने पुणे हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये उसने पैसे परत देऊन न शकल्यामुळे खासगी सावकाराने एका व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. या सावकाराने या व्यक्तीच्या समोरच त्याच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली होती. मात्र मंगळवारी 34 वर्षीय विवाहित महिलेने विवाहित महिलेने या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इम्तियाज हसीन शेख याला अटक केली आहे.

पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उधारी वर घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने या पती आणि पत्नीला भेटायला बोलावले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले.

आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला होता आणि सोशल मीडियावर व्हायरल केला होता. फेब्रुवारीमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात मंगळवारी धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरुन इम्तियाज हसीन शेखविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

दिवसातून ४ वेळा नारळपाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Shocking: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ, रात्री व्हिडिओ कॉल करायची अन्...; नवी मुंबईत खळबळ

Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT