Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात नववीत शिकणाऱ्या मुलाचा गळा चिरला, १४ वर्षीय पोराचं धक्कादायक कृत्य

Pune Crime News: पुण्यातील मांजरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मांजरी परिसरातील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या मुलाचा गळा चिरण्यात आल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील मांजरी येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा गळा चिरल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील मांजरी परिसरातील एका शाळेत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरला आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News)

दरम्यान, शाळेतील वार्षिक समारंभावरुन त्याचा दुसऱ्या मुलाशी वाद झाला होता. त्यांच्यात शा‍ब्दिक चकमकदेखील झाली होती. त्याच रागातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

फिर्यादी मुलगा हा मंगळवारी दुपारी अडीच वाजता वर्गात बसला होता. त्यावेळी त्याच वर्गातील दुसऱ्या १४ वर्षीय मुलाने मागून हा हल्ला केला आहे. हा मुलगा मागून आला आणि गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार केला. गळ्याच्या उजव्या बाजूला काचेचा तुकडा लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.या धक्कादायक प्रकारामुळे इतर मुलांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.(Pune Crime News In Marathi)

हल्ला करणाऱ्या मुलाने जखमी मुलाला मी तुझी विकेट पाडीन, अशी धमकी दिली होती. त्यानंतरच हा हल्ला झाला आहे. प्रसंगावधान दाखवत शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी जखमीला खासगी रुग्णालयता दाखल केले आहे. तर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026: चारधाम यात्रेला जाताय? 'हे' सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही दर्शन, काय आहे नियम?

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Post Office Scheme : ₹१००० गुंतवा अन् महिन्याला मिळवा २०, हजार व्याज; पोस्टाच्या या योजनेत व्हाल मालामाल

भाजपच्या मोर्चावर ताईंनी बाटली फेकून मारली; 'त्या' घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

Actor House Burgled: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी; मोलकरणीने लंपास केले लाखोंचे दागिने आणि रोकड

SCROLL FOR NEXT