Anjali Potdar
कुटुंबीयांना आज तुमचा आधार हवा असेल. निष्काळजी राहा, कारण आर्थिक विवांचना हळूहळू मार्गी लागतील.
आज तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस. गोपाळकाल्याचा आनंद लुटाल. व्यक्तिमत्व विकसित होईल.
आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. स्वतःसाठी पैसा खर्च कराल.
आज आपल्या जुन्या ओळखींना नव्याने पालवी फुटेल. आपल्या माणसांसाठी पैसा खर्च करण्याची तयारी असेल.
तुमच्या देखरेखीखाली अनेकांचे नशीब वाढीस लागेल. प्रयत्नांना यश मिळेल. राजकारणी लोकांना राजकारणामध्ये यश मिळेल.
गोपाळकाल्याचा विशेष मुहूर्तावर आज काही चांगल्या गोष्टी कराव्या वाटतील. इतक्या चांगल्या घटना घडतील, की देवावरचा विश्वास गाढ होईल.
तुमच्या प्रगतीमध्ये आज असंख्य अडथळे येऊ शकतात. वरिष्ठांकडून त्रास होईल. प्रवासात अडथळे येतील.
जोडीदाराबरोबरचा तुमचा अबोला असेल तर तो आज संपुष्टात येईल. पुन्हा नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडाल.
मनासारख्या गोष्टी घडवायच्या असतील तर, आज प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. अन्यथा कामांमध्ये अडथळे येऊ शकतात.
आज तुमच्यासाठी सोनेरी दिवस आहे. शिव आणि कृष्ण उपासना केल्यास कामे पूर्ण होईल.
आज तुम्हाला सर्वांकडून प्रेमाची वागणूक मिळेल. कोणाकडून तरी प्रेरणा घेऊन नव्याने पुढील गोष्टींचे नियोजन कराल.
आज घराची कामे निघतील. त्यामुळे पैसा खर्च कराल. आपला खिसा गरम राहावा यासाठी नवनवीन योजना आखाल