Chaturshringi Police Station
Chaturshringi Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पाळीव श्वानाला दगड का मारला? म्हणत चिडलेल्या मालकालाने केलं भयंकर कृत्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - पाळीव श्वानाला दगड मारल्याने झालेल्या वादातून एकावर कुर्‍हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यातील (Pune) बाणेर परिसरात घडली आहे. या प्रकरणी श्वानाच्या मालकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अयुब शेख असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याने केलेल्या हल्ल्यात रवी घोरपडे गंभीर जखमी झाले आहे. (Pune Crime News)

शेख बिगारी काम करतो तर घोरपडे पेंटर आहे. दोघे शिंदे मळा भागातील वस्तीत राहायला असून, एकमेकांचे परिचित आहेत. घोरपडे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिंदे मळा परिसरातून निघाला होता. त्या वेळी शेख याचा पाळीव श्वान घोरपडे याच्यावर भुंकला.घोरपडेने श्वानाला दगड मारला.

या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की, शेख याने घोरपडे याच्यावर थेट कुर्‍हाडीने वार केले. यात घोरपडे गंभीर जखमी झाला. यावरून चतु:शृंगी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील शिंदे मळा परिसरात शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. रवी घोरपडे याला या हल्ल्यानंतर त्याच्या नाकावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या आणि सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला Sspms ग्राउंडवर होणार सभा

Shantigiri Maharaj: नाशिकमध्ये शिंदे गटाकडून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी?

KKR vs DC: कोलकताच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची बत्ती गुल; KKRसमोर १५४ धावांचे आव्हान

Maharashtra Politics: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार, नारायण राणेंसाठी घेणार सभा

Amit Shah यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं, मोठा अनर्थ टळला!

SCROLL FOR NEXT