Kondhwa Police Station
Kondhwa Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: भावानेच केला भावाचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - दारु पिऊन आई, बहिणीला शिवीगाळ करत असल्याच्या रागातून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. ही धक्कदायक घटना पुण्यातील (Pune) कोंढवा परिसरात घडली आहे. ही घटना शनिवार सकाळी साडे सहाच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत (Police) आईच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

तेजस भोसले असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे तर आकाश भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोठा भाऊ आकाश भोसले यांनी केलेल्या मारहाणीत गळा आवळल्याने व ढकलून दिल्याने लहान भाऊ तेजस भोसले यांचा झाला मृत्यू

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तेजसला दारु पिण्याचे व्यसन होते. दारूच्या नशेत घरी सतत भांडण करायचा इतकेच नाही तर आई, बहिणीला शिवीगाळ करायचा. यावरुन आरोपी आकाश आणि तेजस यांच्यात वाद होत होते. काल रात्री तेजस दारु पिऊन घरी आला आणि आई, बहिणीला शिवीगाळ केली. त्यावेळी या दोघा भावांमध्ये वाद झाले. सतत आईला शिवीगाळ करत असल्याच्या राग आरोपीच्या मनात होता. यावेळी आकाशने केलेल्या मारहाणीत गळा आवळल्याने व ढकलून दिल्याने तेजस भोसले याचा झाला मृत्यू झाला.

सकाळी साडे सहा वाजता तेजस उठत नसल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. तेजस याच्या शवविच्छेदन अहवालातून त्याचा गळा दाबून आणि ढकलून दिल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपी आकाश याला अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हरिश शिळमकर करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shriniwas Pawar News : तर अजित पवारांनी आताच मिशी काढावी, बंधू श्रीनिवास यांची प्रतिक्रिया

Beed News : एटीएम मशीनच नेले चोरून; अंबाजोगाई शहरातील मध्यरात्रीची घटना

Viral Video: क्रुरतेचा कळस! पत्नीने पतीला साखळीने बांधलं; घरात कोंडून केली मारहाण... धक्कादायक VIDEO

LSG vs KKR: KKR कडून पराभवाचा बदला घेण्यासाठी लखनऊचा संघ उतरणार मैदानात! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Today's Marathi News Live : पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ मोदी घेणार बीडमध्ये सभा

SCROLL FOR NEXT