Pune crime Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरूणींचं काय चाललंय? 'पिट्याभाई'चा वेताळ टेकडीवरील व्हिडीओ व्हायरल

Drunk Young Girl Video Viral: पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुळशी पॅटर्नमधील 'पिट्या भाई' ने राज्याला हादरवणारा व्हिडीओ समोर आणला आहे.

Rohini Gudaghe

Pune Drunk Young Girl On Vetal Hill

सध्या पुणे शहरात (Pune) अमली पदार्थ तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी याच्याशी संबंधित मोठं रॅकेट समोर आलं आहे. तसंच यामध्ये तरूणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचंही स्पष्ट झालं आहे. पुणे शहरात तरूण तरूणींमध्ये अमली पदार्थ सेवनाचं प्रमाण देखील वाढलं आहे, याच्याशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. (latest marathi news)

मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई'ने संपूर्ण राज्याला हादरवणारा एक व्हिडीओ समोर आणला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवर (Vetal Hill) नशेत गुंग असणाऱ्या तरुणींचा हा व्हिडिओ (Drunk Young Girl On Vetal Hill) आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पुणे शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. पुणे शहरात नक्की चाललंय तरी काय, असा प्रश्न आता समोर येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नशेत गुंग असणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ

पुण्यातील ड्रग्स प्रकरण ताजं असतानाच वेताळ टेकडीवर दोन महाविद्यालयीन तरुणींनी ड्रग्जचं सेवन केल्यानं 'नशेत धुंद' असलेला एक व्हिडीओ (Drunk Young Girl Video Viral) आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे, तर दुसरी मुलगी ड्रग्जचं सेवन केल्याने नशेत बडबडताना दिसत आहे.

मराठी अभिनेता रमेश परदेशी (Mulshi Pattern Fame Ramesh Pardeshi) याने स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यानी म्हटलंय की, वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या, असं मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई'ने सांगितलं आहे.

पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन

व्हिडिओमध्ये दिसतंय की, नशेमध्ये धुत असलेल्या या मुलींना नीट उभंही राहता येत नाही. पिट्याभाईने पुण्याला हादरवणारा Video समोर आणला आहे. शहरात शिकण्यासाठी हजारो लाखो मुलं (Drunk Young Girl Video) येतात. नशा करतात, कुटुंबीयांना याची कल्पना नसते. अशा घटनांमुळे घाबरायला होतं, असं रमेश परदेशी यांनी म्हटलं आहे.

महाविद्यालयीन तरूण तरूणी रात्रभर पब, हॉटेल, बारमध्ये पार्टी करतात. नशेत गुंग होतात, पालकांचं याकडे काहीही लक्ष नाही, ही बाब अतिशय गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं (pune news) आहे. शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असणारं पुणे शहर आता नशेचं माहेरघर होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी या तरूणींचा मदत केली आहे. त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणार असल्याचं सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: तुळशीजवळ ठेवू नका 'या' गोष्टी घरातून निघून जाईल सुख- शांती

Maharashtra News Live Updates : पाकिस्तानात छत्रपती शिवरायचा पुतळा उभारु - संजय राऊत

Viral Video: आवाजावरून दोन गट एकमेकांना भिडले, हातात काठ्या आणि तलवारी घेऊन जोरदार राडा; पाहा VIDEO

IPL 2025 Auction साठी 1574 खेळाडूंनी नोंदवलं नाव! केव्हा, कुठे आणि कधी होणार ऑक्शन? जाणून घ्या

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृताच्या घरी नवीन पाहुणा कधी येणार? प्रेग्नेंसीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT