Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: लय माज आला आहे का?, ८ दिवसांत डेमो देतो; शिंदे गटाच्या पुण्यातल्या नेत्याला धमकी

Crime News: यापूर्वीही सातव यांना दोनवेळा चिठ्ठी द्वारे धमकी (Threat) देण्यात आली आहे. सातव यांनी लोणीकंद पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

Ruchika Jadhav

सचिन जाधव

Pune News:

पुण्यातून (Pune) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाचे पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख गणेश सातव यांना एका चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आलीये. सातव यांच्या कारवर चिठ्ठी ठेवून अज्ञात व्यक्ती तेथून निघून गेलाय. या धमकी प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गणेश सातव यांच्या कारवर चिठ्ठी चिटकवत ही धमकी दिली. त्यांची कार घराजवळ उभी असताना ही चिठ्ठी चिटकविण्यात आली. गणेश सातव लय माज आला आहे का? तुझ्यावर वार करणार आहे, तुला आठ दिवसात डेमो देतो, अशा आशयाचा मजकूर धमकीच्या चिठ्ठीत आहे. यापूर्वीही सातव यांना दोनवेळा चिठ्ठी द्वारे धमकी (Threat) देण्यात आली होती. सातव यांनी लोणीकंद पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

पुणे जिल्ह्यात युवकांची संघटन करून विविध रोजगार मिळावे तसेच कार्यकर्ते मेळावा घेण्यासाठी तत्पर असणाऱ्या गणेश सातव यांना २ वेळा यापूर्वी अशीच धमकीची चिठ्ठी आली होती. यापूर्वी त्यांच्या चार वाहनांच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार शिवसेना नेते शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्याला धमकी दिल्याने गणेश सातव यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते, आमदार, खासदार यांच्यासह कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांना धमकीचे फोन येतायत. एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील धमकीचा फोन आला होता. डायल ११२ नागपूर या नंबरवर एकनाथ शिंदेंना धमकीचा फोन आला होता. मी एकनाथ शिंदे यांना उडवणार अशी धमकी या फोन कॉलमधून देण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीनेमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी पोलिसांनी हा नंबर ट्रेस केला. नंबर ट्रेस केल्यावर हा व्यक्ती पुण्यातील वारजे येथे राहत असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी यानुसार आरोपी व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. यासह मुख्यमंत्री बोलले नाही तर मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ, अशीही धमकी एका व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT