pune crime news daund Taluka doctor atul divekar wife son killed  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: मामाच्या मुलीसोबत लग्न, १० वर्षांचा सुखी संसार; शांत स्वभावाच्या डॉक्टरने अख्खं कुटुंब का संपवलं?

Daund Taluka Doctor News: वरवंड येथील डॉक्टर अतुल शिवाजी दिवेकर यांनी पत्नी पल्लवी दिवेकर (वय ३५), मुलगा अद्वित (वय १०) आणि मुलगी वेदांतीका (वय ७) यांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली.

साम टिव्ही ब्युरो

Pune Doctor News: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मंगळवारी (२० जून) सायंकाळी एक भयानक घटना घडली. वरवंड येथील डॉक्टर अतुल शिवाजी दिवेकर यांनी पत्नी पल्लवी दिवेकर (वय ३५), मुलगा अद्वित (वय १०) आणि मुलगी वेदांतीका (वय ७) यांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

अत्यंत शांत आणि संयमी स्वभाव पेशाने जनावरांचा डॉक्टर असणाऱ्या डॉ. अतुल शिवाजी दिवेकर यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? अशा भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी (Police) या हत्याप्रकरणात महत्वाची माहिती दिली आहे.

डॉक्टर अतुल दिवेकर हे मूळ वरवंड (Pune Crime News) येथील राहणारे होते. त्यांनी मामाच्याच मुलीसोबत लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला १० वर्ष झाली होती. लग्नानंतर त्यांचा सुखी संसार सुरू होता. मात्र अचानक डॉक्टरांनी हे पाऊल उचलले.

माहितीनुसार, अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक कारणामुळे असं टोकाचं पाऊल उचललं आहे. बायकोचा त्रास असल्याने डॉक्टरांनी अख्खं कुटुंब संपवल्याची चर्चा आहे. माणूस कितीही शांत सरळ स्वभावाचा असला तरी त्याची मानसिकता बदलली तर काय होऊ शकतं, याचं उदाहरण या घटनेवरून समोर आलं आहे.

आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर मुलांना विहिरीत फेकलं

पोलिसांना घटनस्थळावरून सुसाईड नोट मिळाली. कौटुंबिक त्रासातून मी हे कृत्य केले असून बायकोची हत्या करून माझ्या मुलांना मी विहिरीत फेकून दिले आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी अतुल आणि त्यांची पत्नी पल्लवी (Crime News) यांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

तर मुलगा अद्वित अतुल दिवेकर आणि मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर यांचे मृतदेह विहिरीत आढळले आहेत. विहीर जवळपास १० परस इतकी खोल असून ४५ फूट एवढे पाणी असल्याने मुलांना वर काढण्यात मोठी अडचण येत होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मंगळवारी रात्री उशिरा दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT