Dattatray Gade Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Dattatray Gade Pune Crime : दत्ता गाडे गायब कुठे झाला? २५ एकर ऊसाची शेती, १०० पोलीस, ड्रोन कॅमेऱ्यानं शोध, पण....

Dattatray Gade : स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार आहे. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची शोधमोहीम सुरु आहे. गाडे न सापडल्याने पोलीस पुन्हा पुण्याला परतले आहेत.

Yash Shirke
swargate

पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये साडेपाचच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. ही घटना समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली. महाराष्ट्रभर या घटनेवरुन संताप व्यक्त करण्यात आला.

pune swargate

ही तरुणी पुण्याहून फलटणला निघाली होती. त्याच दरम्यान तिला बस डेपोमध्ये आरोपी भेटला. त्याने एका रिकाम्या शिवशाही बसमध्ये तरुणीला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

pune crime update

या घटनेमुळे पीडित तरुणी प्रचंड घाबरली. मानसिक ताण आल्याने ती काही न बोलता थेट घरी निघाली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

swargate case

स्वारगेट डेपोमधील बलात्कार घटनेतील आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असून तो शिरूरच्या गुनाट गावचा असल्याची माहिती समोर आली.

shirur

त्याच दरम्यान दत्तात्रय गाडे हा शिरूरच्या गुनाट गावचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बलात्कार घटनेनंतर दत्ता गाडे हा गुनाट गावात गेल्याचे समजताच पुणे पोलीस येथे पोहोचले.

gunat village

आरोपी दत्ता गाडे हा गावातल्या ऊसाच्या शेतामध्ये लपून बसला आहे असा पोलिसांना संशय होता. ग्रामस्थांनीही त्याला दुजोरा दिला. तो गावात आल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.

drone

ड्रोन कॅमेरे, श्वान पथक यांच्या मदतीने शेतात दत्तात्रय गाडेचा शोध सुरु झाला. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पोलिसांना शोधमोहीमेत काहीसा अडथळा देखील आला.

pune police

पुणे ग्रामीण पोलीस दलातील १०० पोलीस गुनाट गावामध्ये पोहोचले. पुढे १०० पोलीस आणि ग्रामस्थ यांनी मिळून दत्ता गाडेचा शोध घेण्यास सुरूवात केली.

gunat

दुपारपासून संध्याकाळपर्यंत पोलिसांनी तब्बल २५ एकर ऊसाच्या शेतामध्ये दत्तात्रय गाडेचा शोध घेतला. पण इतक्या मोठ्या प्रमाणात शोध घेऊनही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

police

बिबट्यांचा वावर आणि अंधार पडायला सुरूवात झाल्याने पोलीस आणि ग्रामस्थ हे परत गुनाट गावामध्ये परतले. १०० पोलिसांची तुकडी ही गुनाट गावाहून पुण्याला जायला निघाली.

pune police news

पुणे पोलिसांकडून इतकी मेहनत घेऊनही फरार आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध लागला नाही. दरम्यान आम्ही लवकरच आरोपीला पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT