Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: शस्त्राचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटले; सराईत गुन्हेगारासह दोघांवर मोक्काची कारवाई

Crime News In Marathi: १० जुलै रोजी पुण्यात शस्त्राचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटल्याची घटना घडली होती.

Gangappa Pujari

Pune Crime News:

पुणे शहरात हत्याराचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुबाडल्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. या प्रकरणात सराईत गुन्हेगार नीलेश बनसुडे आणि त्याच्या दोन साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १० जुलै रोजी पुण्यात (Pune) शस्त्राचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटल्याची घटना घडली होती. फिर्यादी आपल्या मित्रासह १० जुलै रोजी दुचाकीवरून दिवेघाटातून येत असताना मोटारीतून आलेल्या आरोपींनी त्यांना अडविले. त्यांना पिस्तुलासारख्या हत्याराचा धाक दाखवून दीड हजार रुपये काढून घेतले.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बनसुडे याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

नीलेश मल्हारी बनसुडे (वय २६, रा. बनसुडे मळा, इंदापूर), ओम सोमदत्त तारगांवकर (वय २१, रा. महतीनगर, इंदापूर), रोहित मच्छिंद्र जामदार (वय २३, रा. कसबा पेठ, इंदापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ६९ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांविरुध्द मोका कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT