Pune Crime News Amravati Assistant Deputy Commissioner of Police's wife and nephew killed Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पत्नी आणि पुतण्याची हत्या करत सहाय्यक पोलीस आयुक्ताने संपवलं जीवन; पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Crime News: अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वर देखील गोळी झाडत आपली जीवनयात्रा संपवली.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News: पुणे शहरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वर देखील गोळी झाडत आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली.

पोलीस आयुक्त भारत गायकवाड , पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात (Pune News) वास्तव्याला होते. सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भरत यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पत्नी आणि पुतण्याचा खून केल्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भरत यांनी नेमकी ही हत्या का केली? त्यानंतर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू केला आहे. एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

SCROLL FOR NEXT