Nashik Breaking News: अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने टोलनाक्याची तोडफोड; पोलिसांकडून मनसैनिकांवर मोठी कारवाई

Nashik Police Action Against MNS Workers: मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा अडवल्याने संतप्त झाल्याने मनसैनिकांनी समृद्धी महामार्गावरील सिन्नर येथील टोलनाक्याची तोडफोड केली होती.
Nashik Police Action Against MNS Workers
Nashik Police Action Against MNS WorkersSaam TV
Published On

Nashik Police Action Against MNS Workers: मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा अडवल्याने संतप्त झाल्याने मनसैनिकांनी समृद्धी महामार्गावरील सिन्नर येथील टोलनाक्याची तोडफोड केली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टोल नाका मॅनेरजरच्या तक्रारीवरून पोलिसांनी १२ ते १५ मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक ग्रामीणच्या वावी पोलिसांनी (Police) हा गुन्हा दाखल केला असून लवकरच तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना अटक होण्याची शक्यता आहे. टोल मॅनेजरच्या तक्रारीत ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा उल्लेख आहे.

Nashik Police Action Against MNS Workers
Maharashtra Politics: शिंदे गटाचं लवकरच विसर्जन होणार; भाजपकडून तयारी पूर्ण, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं विधान

अमित ठाकरे हे ४ ते ५ दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते अहमदनगर, शिर्डी येथे गेले होते. समृध्दी महामार्गावरून ते नाशिककडे परतत असताना सायंकाळी साडेसात वाजता सिन्नर तालुक्यातील टोल नाक्यावर त्यांचे वाहन कर्मचाऱ्यांनी अडवले.

स्वतःची ओळख देऊनही टोल नाक्यावरून वाहन सोडले गेले नाही. सुमारे अर्धा तास त्यांचे वाहन कर्मचाऱ्यांनी रोखून धरले. अरेरावीची भाषा केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यावेळी अमित ठाकरे यांच्या समवेत कुणी पदाधिकारी नव्हते. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच मनसैनिकांनी (MNS Workers) टोलनाका गाठत तोडफोड केली.

टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी उद्धट भाषा वापरली. फास्ट टॅग असूनही बराचवेळ गाडी थांबवण्यात आली, टोकनाक्यावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र, मॅनेजरसह कर्मचारी अमित ठाकरे यांच्यासोबत उद्धट भाषणे बोलले असा दावा मनसैनिकांकडून करण्यात आला होता.

Nashik Police Action Against MNS Workers
Chandrapur Crime News: चंद्रपुरातील राजुरा शहरात पुन्हा गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर टोलनाका मॅनेजरने नाशिक ग्रामीण भागातील वावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी १२ ते १५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

मी तिथल्या एसपीसोबत बोललो. अमित ठाकरे यांच्या गाडीला फास्ट टॅग आहे. त्यामुळे टोलनाक्यावर प्रॉब्लेम येत नाही. तिथे टोलनाक्यावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. कार्यकर्त्यांनी याबाबत तिथल्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, कर्मचारी उद्धट बोलले, त्यांनी असं बोलायला नको होतं, नेत्याच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला, असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com