Pimpari Chinchwad Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

हॉरर फिल्म बघायची सवय, बाहुलीला फाशी दिल्यानंतर ८ वर्षीय मुलानंही घेतला गळफास

कमल खेम साऊद असे आत्महत्या केलेल्या चिमुरड्याचे नाव आहे

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून (Pimpari Chinchwad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळता खेळता बाहुलीला फाशी दिल्यानंतर ८ वर्षीय मुलाने स्वतः ही गळफास घेत आत्महत्या केली. कमल खेम साऊद (वय ८) असे आत्महत्या केलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील थेरगावम परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. (Pimpari Chinchwad Latest Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कमल आपल्या बाहुलीशी खेळत होता. जवळच त्याचा लहान भाऊ आणि बहिणी देखील खेळत होत्या. कमलची आई कामात व्यस्त होती. तर, वडील बाहेर गेले होते. दरम्यान, बाहुलीसोबत त्याने खेळत असताना आपल्या बाहुलीला फाशी दिली. एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधला होता. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्यानंतर कमलने देखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला.

कमलला मोबाईलवर 'हॉरर' फिल्म पाहण्याची सवय होती. त्यामुळेच त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. काही वेळानंतर कमलच्या आईने खोलीत येऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता कमल मोबाईलवर 'हॉरर' चित्रफीत पाहत असल्याचे समोर आले.  त्यामुळे 'हॉरर' फिल्मचा एखादा सिन पाहूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगतले जात आहे. तपास वाकड पोलिस करीत आहेत.

... अन तिच्या काळजात चर्रर्र झाले

मृत कमल दोन्ही मुलांपेक्षा वयाने मोठा आणि हुशार होता. आई कामात असताना तोच लहान भावंडाना सांभाळत होता. रविवारी दुपारी ज्यावेळी कमलच्या आईने खोलीत डोकावून पहिले तेव्हा बाहुलीचे तोंड बांधून तिला गळफास दिल्याचे तिला दिसले. तसेच, पोटाचा गोळा फासावर लटकलेले भीतीदायक चित्र नजरेस पडले. कमलला अशा अवस्थेत पाहून तिने जोरात हंबरडा फोडला. कमल अशी थट्टा करून नको, म्हणून आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : वॉशिंग मशीन नियमित साफ कशी करावी? जाणून घ्या स्मार्ट टिप्स

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

SCROLL FOR NEXT