Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात भामट्यांची टोळी सक्रिय! सैन्यात नोकरीचे प्रलोभन दाखवत तरुणाची 28 लाखांची फसवणूक

पुण्यात भामट्यांची टोळी सक्रिय! सैन्यात नोकरीचे प्रलोभन दाखवत तरुणाची 28 लाखांची फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

>> अक्षय बडवे

Pune Latest Crime News: भारतीय लष्कर सेवेत भरती करून देतो असे आश्वासन देऊन एका 26 वर्षीय तरुणाला तब्बल 28 लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. इतकच काय तर त्या तरुणाचा विश्वास संपादन करण्यासाठी डमी म्हणजेच खोटे अधिकारी देखील तयार करण्यात आले होते. या लष्कर भरती घोटाळ्याची व्याप्ती भयानक असून शंभरहून अधिक तरुणांना यात गंडा घातल्याची शक्यता आहे.

तरुणाला गंडा घालणाऱ्या या भामट्याचं नाव आहे प्रमोद यादव. स्वतःला भारतीय लष्करात अधिकारी म्हणून घेणाऱ्या आणि मोठ्या मोठ्या ओळखी सांगणाऱ्या प्रमोदने पुण्यातील एका तरुणाला लष्कर दलात नोकरी लावून देतो, असे सांगून त्याच्याकडून तब्बल 28 लाख रुपये उकल्ल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. (Latest Marathi News)

कशी केली फसवणूक?

या प्रकरणात एका तरुणाने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार हे भारतीय लष्करात भरतीसाठी प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची ओळख प्रमोद शी झाली. तेव्हा प्रमोद ने त्यांना वारंवार परीक्षेसाठी पैश्याची मागणी केली तसेच परीक्षा देण्यासाठी तुम्हाला यायला लागेल, त्याची तयारी करावी लागेल, असे खोटे मार्गदर्शन केले.

इतकचं नव्हे तर आरोपी प्रमोदने त्या तरुणाचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय लष्कराच्या युनिफॉर्म 7 ते 8 डमी अधिकारी उभे केले. इतकाच काय तर प्रमोद ने काश्मीरमध्ये जाऊन आर्मी युनिफॉर्मवर फोटो शूट करून आपण कसे तिथे काम करतोय हे देखील सांगितले.

दरम्यान, प्रमोदचे स्वप्न होतं की स्वतः भारतीय लष्करात जावं. पण प्रयत्न करून सुद्धा अपयश येत असल्याने त्याने हे कृत्य केलं असल्याचं तपासातून समोर आलं आहे. आत्तापर्यंत प्रमोदच्या खात्यात 46 लाखापेक्षा जास्त रक्कम आढळून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे आरोपपत्राशिवाय ३ महिन्यांपेक्षा जास्त निलंबन नको; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Women's Reservation Bill: महिला आरक्षणासाठी केंद्र सरकारचा मोठा प्लॅन! लोकसभेच्या जागा ५४३ वरून थेट ८५० होणार? विशेष अधिवेशनात काय घडणार?

Pune Crime: पुण्यात किरकोळ कारणावरून वाद, तरुणाची भररस्त्यात हत्या; ८ जणांना जन्मठेप

Weather Update: थंडी गायब, पावसाचा धुमाकूळ सुरूच; १० ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज; ताशी ६० किमीच्या वेगाने वारे वाहणार

Friday Horoscope : शुक्रवारी ५ राशींचं नशीब चमकणार! कन्या राशीला घर-गाडीचा योग, 'या' राशींचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT