Pune Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात पुन्हा कोयता गॅंगचा धुमाकूळ! टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Pune News: पुण्यातील हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीने पुन्हा एकदा राडा घातल्याचा प्रकार घडला.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यातील हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीने पुन्हा एकदा राडा घातल्याचा प्रकार घडला. यामध्ये २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील (Pune) हडपसर (Hadapsar) परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये कोयता गॅंगने राडा घातल्याचे समोर आले. कॉलेजमधील झालेल्या किरकोळ वादानंतर आठ ते दहा जणांनी हातात कोयते घेऊन हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत तरुणावर कोयत्याने हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये मिलिंद मधुकर कांबळे (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला. किरकोळ वादानंतर टोळक्याने हातात कोयते घेत मिलिंद राहत असलेल्या परिसरात येवून हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हडपसर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात....

लोहगाव परिसरात पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करताना राजस्थानमधील एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ५८ लाखांचे मॅफेड्रोन आणि हेरॉइन जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-दोनच्या पथकाने ही कारवाई केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

SCROLL FOR NEXT