Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune News: नोकरी शोध म्हटल्याने मुलाला राग अनावर; थेट वडिलांनाच संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

Crime News : एका २० वर्षीय तरुणाने जन्मदात्या वडिलांची कात्रीने भोसकून हत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Crime News

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाने जन्मदात्या वडिलांची कात्रीने भोसकून हत्या केली आहे. इतकंच नाही तर आईवरही वार केले. या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला असून आई जखमी झाली आहे. सोमवारी रात्री दीडच्या सुमारास टिंगरेनगर परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. लक्ष्मण सुरेश मंजुळे(वय ५५) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर शिवनाथ मंजुळे (वय २०) असं खून करुन पसार झालेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवनाथ हा बेरोजगार आहे.

तो कामधंदा करत नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला समज दिली. काम कर, चांगला रहा, असं वडिलांनी सांगितलं. हे ऐकून मुलाचा राग अनावर झाला. यावरून शिवनाथला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात घरातील पडलेली कात्री उचलून वडिलांवर सपासप वार केले. आईने त्याला अडवलं असता, त्याने आईलाही जबर मारहाण केली.

या घटनेत लक्ष्मण यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी शिवनाथचा मामांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

Delhi Capitals: दिल्लीच्या नव्या कर्णधाराचं नाव ऐकून व्हाल हैराण; ऋषभ पंतनंतर कोण सांभाळणार कमान?

SCROLL FOR NEXT