Pune Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस; मध्यरात्री २०- २५ वाहनांची तोडफोड, परिसरात खळबळ

Crime News: पुण्यातील येरवडा भागात वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या तोडफोडीत २० ते २५ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. २६ डिसेंबर २०२३

Pune Crime News:

पुणे (Pune) शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. खून, मारामाऱ्या, हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. शनिवारी मध्यरात्री पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Pune Breaking News)

कोयता गँगचा धुमाकूळ..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल मध्यरात्री काही अज्ञातांकडून रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. पुण्यातील येरवडा (Yerawada) भागात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या तोडफोडीत २० ते २५ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कार, दुचाकी आणि रिक्षा या वाहनांचा यामध्ये समावेश आहे.

मध्यरात्री वाहनांची तोडफोड..

दहशत माजवण्यासाठी धारधार शस्त्राने तरुणांकडून असा धुडगूस घातला जात असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. (Crime News in Marathi)

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण...

दरम्यान, शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलीस अशी तोडफोड करणाऱ्या लोकांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याची तक्रार या नागरिकांनी केली आहे. तसेच या हुल्लडबाजांचा कायमचा बंदोबस्त करावा.. अशी मागणीही पुणेकरांनी केली आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

SCROLL FOR NEXT