Police investigate after a 17-year-old was attacked by masked assailants in Pune’s Manikbag area saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर टोळक्यांची दहशत; १७ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

Youth Brutally Attack In Pune : पुण्यातील माणिकबाग परिसरात चार अज्ञात हल्लेखोरांनी १७ वर्षीय मुलावर गंभीर हल्ला केला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Akshay Badve

  • पुण्यातील माणिकबाग परिसरात १७ वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला.

  • चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राचा वापर केला.

  • बर्गर किंग दुकानासमोर घटना घडली.

पुण्यातील माणिकबाग भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. माणिकबाग भागातील बर्गर किंग दुकानासमोर दोन दुचाकींवरून आलेल्या चार तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून तरुणावर हल्ला केला.

पुण्यातील गुन्हे कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी ह्याव ना त्याव उपक्रम केली. अनेक प्रकारची ऑपरेशन केलं, इतकेच नाही तर शहरातील गुंडांना पोलिसांकडून तंबी देखील दिली. तरीही शहरात टोळ्यांची दहशत कमी झालेली दिसत नसल्याचं माणिकबाग भागातील प्रकारावरून दिसून येत आहे. परिसरात या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोर दोन दुचाकींवरून आले होते, त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. हल्लेखोरांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याने अल्पवीन मुलगा गंभीररीत्या जखमी झाला. भररस्त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. जखमी मुलाला पोलीस आणि स्थनिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सिंहगड रस्त्यावर टोळक्याच्या दहशतीने सर्वसामान्य नागरिक भयभीत झालेत.

अलीकडच्या काळात घडलेल्या विविध घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जातेय. कधी कोयता गँगकडून हल्ल्यावर हल्ले, कधी अंतर्गत टोळीयुद्ध, कधी वाहनांची तोडफोड आदी घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनलीय.

तरुणावर कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला

दोन जणांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना नवी सांगवी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास वाघजाई चौकाजवळील राजाराम नगर परिसरात अंशुमन कागडा आणि विकास उर्फ विशू कांबळे यांच्यात वाद झाला होता.

हा वाद मिटवण्यासाठी वेदांत मदने नावाचा तरुण आपल्या काही मित्रांसह तेथे गेला. दोघांमधील भांडण थांबवून शांतता निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण वेदांत मध्यस्थी करत असल्याचे पाहून प्रथमेश गणेश शिंदे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना राग आला. त्यांनी स्वतःला परिसरातील प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगत वेदांतला धमकावलं आणि त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी अपडेट! दादांच्या विमानाचा पायलट वैफल्यग्रस्त? पवारांचा दिल्लीतून नवा बॉम्ब

अलिबागच्या समुद्रात उलटली प्रवासी बोट? कुणी लपवला अपघाताचा व्हिडिओ?

अरोरांची राज्यसभेसाठी फिल्डिंग? भुजबळ अस्वस्थ, कोल्हेंचा मोठा दावा

शिवजयंतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा अपमान, भाजपच्या बुचकेंची अरेरावी? राष्ट्रवादीत संतापाची लाट, पाहा VIDEO

संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी कृष्णा आंधळे तीनदा गावात; राजकीय अभय?

SCROLL FOR NEXT