Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात १३ वर्षीय मुलीचा विनयभंग; माझी बायको होशील का?; नाहीतर उचलून...

माझ्याशी मैत्री केली नाही तर मी तुला उचलून घेऊन जाईल अशी धमकी मुलाने दिली होती.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Pune News: ऑनलाईन शिक्षण पध्दतीने आता प्रत्येक शालेय विद्यार्थ्याच्या हातात फोन पाहायला मिळतो. अशात याच फोनचा आणि सोशल मीडियाचा गैरवापर करत पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकीत शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्याच शाळेतील मुलीचा विनयभंग केला आहे. या घटनेने शाळेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

सदर घटना ही हडपसर येथील आहे. १४ वर्षीय मुलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. हे दोघे एकाच शाळेतील (School) विद्यार्थाी असून मुलगा पीडित मुलीला खूप दिवसांपासून त्रास देत होता. त्याने मैत्रीसाठी मुलीला धमकी देखील दिली होती. माझ्याशी मैत्री केली नाही तर मी तुला उचलून घेऊन जाईल अशी धमकी मुलाने दिली होती.

कितीही प्रयत्न केले तरी मुलगी मैत्री (Friendship) करण्यास तयार नसल्याने मुलाने वेगळी शक्कल लढवत पीडितेचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला आणि कॅप्शनमध्ये माझी बायको होशील का असे लिहिले. हे पाहून मुलीने सर्व प्रकार घरी सांगण्याचा निर्णय घेतला. तिने आईला सर्व घटना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने लगेचच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत सदर मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT