Pune Junnar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : बॅगेतून कोयता काढला, १६ वर्षीय विद्यार्थ्यावर हल्ला केला; पुण्यातील नामांकित शाळेतील धक्कादायक घटना

Pune Junnar Crime News : पुण्यातील शाळेत १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला असून विद्यार्थ्याच्या हाताला दुखापत झाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Alisha Khedekar

  • ओतूर येथील शाळेत हल्ल्याचा प्रयत्न

  • १७ वर्षीय अल्पवयीन आरोपी ताब्यात

  • विद्यार्थ्याच्या हाताला दुखापत

  • शाळेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

रोहिदास गाडगे, पुणे

Pune Junnar School Student Attacked With Sickle पुण्यातील वाघोली परिसरातील रायसोनी कॉलेजसमोर एका विद्यार्थ्याने किरकोळ वादातून दुसऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील एका नामंकित शाळेत १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेने शाळेच्या सुरक्षा व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील एका नामंकित शाळेत काल म्हणजेच १६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास सदर प्रकार घडला. एक अनोळखी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा अचानक वर्गात घुसला आणि आपल्या दप्तरातून कोयता काढत जुन्या रागातून १६ वर्षीय विद्यार्थ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत विद्यार्थ्याने हातावर वार झेलत स्वतःचा बचाव केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत विद्यार्थ्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

शाळेसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शाळा परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

पुण्यात नेमकं काय घडलं?

पुण्यातील वाघोलीतील रायसोनी कॉलेजसमोर नागेश जगताप हा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी थांबला होता.त्याच वेळी जुना वाद मनात धरून मंगेश सांगळे हा आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. “तू मला शिवी का दिली?” असा जाब विचारत आरोपीने अचानक नागेशवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर वार झाले. हल्ला इतका भयानक होता की आरोपीने मारलेला कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला. तीन आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'फुलांची दरी' पाहिली का? पावसाळ्यात पाहायला मिळतो निसर्गाचा रंगीबेरंगी चमत्कार

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत 14 आत्मसमर्पित माओवाद्यांना भुखंड वाटप

भाजप नेत्याचं शिंदेसेनेला खळबळजनक पत्र; मित्रपक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याची मागणी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! जुना पुणे नाका-बोरामणी नाका उन्नत मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार

India squad announced : टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला पुन्हा संधी, कुणाचं कमबॅक?

SCROLL FOR NEXT