Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: चुलतीला 'आय लव्ह यू' म्हणाला, संतापलेल्या चुलत्याने तरुणाला जागीच संपवलं; पुणे हादरले

Pune Police: पुण्यामध्ये चुलतीला आय लव्ह यू म्हटल्यामुळे संतापलेल्या चुलत्याने पुतण्याचा जीव घेतला. हॉकी स्टिकने बेदम मारहाण करत तरुणाला जागीच संपवण्यात आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीला आय लव्ह यू म्हणाल्यामुळे संतापलेल्या चुलत्याने तरुणाला संपवलं. पुण्यातील चंदनगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चुलतीला आय लव यू म्हणाल्याने चिडलेल्या पुतण्याने तरुणाची हत्या केली. पुण्यातील चंदननगर परिसरातील आंबेडकर वसाहतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर आणि समर्थ उर्फ पप्पू शर्मा यांनी साईनाथची हत्या केली.

साईनाथने त्याच्या चुलतीला आय लव्ह यू म्हणत छेड काढली. याचाच राग आल्यामुळे संतोष आणि पप्पू या दोघांनी साईनाथला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साईनाथचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साईनाथचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर चंदननगर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाच तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sydney BMW Crash: पोटात ८ महिन्याचं बाळ, भरधाव कारने गर्भवतीला उडवले, एका क्षणात दोघांचाही मृत्यू

Leopard Attack : ऑपरेशन लेपर्ड! बिबट्याच्या नसबंदीसाठी वनविभागाची सर्वात मोठी मोहीम, पण 'या' आव्हानांचे काय?

Maharashtra Live News Update: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंटवर टाकला दरोडा

Garlic Benefits: सकाळी रिकाम्या पोटी 1 लसणाची पाकळी खाल्ल्यावर हार्ट अटॅक ते डायबेटीजचा धोका टळतो, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Shocking: हे बाळ आमच्या मुलाचं नाही..., सासू-सासऱ्यांकडून चारित्र्यावर संशय; सुनेने ९ महिन्यांच्या मुलीला संपवलं

SCROLL FOR NEXT