Pune Crime New  x
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Pune Crime New : पुण्यात एका व्यक्तीला घरी बोलावून, दारू पाजून त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Yash Shirke

Pune : पुण्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून, त्याला दारू पाजून नशेचा फायदा उचलत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी किरकोळ वादातून मृतकाची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह भीमा नदीमध्ये फेकल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शानू रफिक शेख ही व्यक्ती विलेपार्ले, मुंबईहून कामाच्या निमित्ताने ताथवडे येथील एका कंपनीमध्ये आली होती. घरी न पोहोचल्याने, मोबाईलफोन बंद आढळल्यामुळे कंपनीतील व्यवस्थापकांनी वाकड पोलीस ठाण्यात शानू यांची बेपत्ता असल्याची नोंद केली. हे प्रकरण पुढे गुन्हे शाखा युनिट चारकडे सोपवण्यात आले.

गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी शानू यांचा शोध घेत असताना पेरणे फाटा, भीमा नदीपात्रामध्ये एक मृतदेह आढळून आली. तपासानंतर हा मृतदेह शानू शेखचा असल्याची स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर पोलिसांनी संशयित शरद घरद याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक शानू शेखला जेवणाच्या बहाण्याने शरद घरद याने काळेवाडी येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर त्यांनी दारू देखील प्यायली. दारूच्या नशेत दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून शरदने शानूची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह भीमा नदीत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी शरद घरद आणि गिरीधर रेडे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT