The accused, Siya Goyal and Chetan Chaudhary, who were arrested by Pune Rural Police for the pre-planned murder of Ketan Agrawal at Lohagad Fort. Saam tv
मुंबई/पुणे

केतन अग्रवाल खून प्रकरणात धक्कादायक खुलासा; आरोपी सिया आणि चेतनने 'लोहगड' का निवडला? अखेर गूढ उकलले

Pune Rural Police Forensic Updates On Ketan Agrawal Case: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपी सिया आणि चेतनने हत्येसाठी लोहगड किल्ल्याची निवड का केली आणि पुरावे कसे नष्ट केले

Omkar Sonawane

राज्यात सध्या गाजत असलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात रोज नवनवीन आणि थक्क करणारे खुलासे होत आहेत. केतनचा काटा काढण्यासाठी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लोहगड किल्ल्याचीच निवड का केली? याचे गूढ अखेर उकलले आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि रेकी करून हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे.

मे महिन्यातच झाली होती किल्ल्याची 'रेकी'

मिळालेल्या माहितीनुसार, मृत केतन अग्रवाल याला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती, ही गोष्ट आरोपी सिया गोयल हिला माहीत होती, याच आवडीचा फायदा घेण्याचे आरोपींनी ठरवले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सिया आणि केतन हे दोघे लोहगड किल्ल्यावर गेले होते. मात्र, हा केवळ साधा ट्रेक नव्हता, तर तो खुनाचा कट रचण्यासाठी एक भाग होता. याच दरम्यान सियाने संपूर्ण किल्ल्याची बारकाईने 'रेकी' केली होती.

किल्ल्यावर कुठल्या ठिकाणी किती सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवले आहेत, कुठला परिसर कॅमेऱ्याच्या नजरेत येत नाही, याची संपूर्ण माहिती सियाने काढली होती. यूट्यूबवर व्हिडिओ सर्च: लोहगड किल्ल्याचे गुपिते आणि वाटा समजून घेण्यासाठी सियाने सोशल मीडिया आणि गुगलवर किल्ल्याचे अनेक व्हिडिओ सर्च केले होते.

पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईलमधील डेटा केला 'डिलीट'

१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अत्यंत शातीरपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.

३ दिवस पोलीस चकवा: घटनेनंतर तब्बल तीन दिवसांनी, म्हणजेच २१ जून रोजी पुणे ग्रामीण पोलिसांनी चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांना अटक केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

दैनिक राशिभविष्य... मेष, कर्क ते वृश्चिक, मीन...१२ राशींसाठी कसा असेल शुक्रवार? तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, २० जुलैला दिल्लीत जाणार, VIDEO

Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT