Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'सोबत भयंकर घडलं, ५ लाखांच्या कारसाठी सासरच्यांकडून छळ

Pune Police: पुण्यामध्ये आयटी इंजिनिअर तरुणीने सासरच्या छळाला कंटालून आत्महत्या केली. कार खरेदी करण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणण्यासाठी तिला त्रास दिला जात होता.

Priya More
  • पुण्यात नवविवाहित आयटी इंजिनिअर तरुणीची आत्महत्या

  • हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक छळ

  • कारसाठी ५ लाख रुपये माहेरून आणण्यसाठी छळ

  • सासरच्यांकडून छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील वैष्णवी हगवनणे प्रकरणासारखी आणखी एक धक्कादायक घटना घडली. सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी गिरसे या विवाहितेने आत्महत्या केली. राहत्या घरी तिने गळफास घेत आयुष्य संपवलं. कार घेण्यासाठी माहेरच्यांकडून ५ लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत वैष्णवीचा छळ केला जात होता. अवघ्या चार महिन्यापूर्वी लग्न झालेल्या आयटी इंजिनियर वैष्णवीने राहत्या घरी आयुष्य संपवलं. गुरुवारी रात्री ही घटना घडली.

वैष्णवी ओंकार गिसरे (वय २३ वर्षे) असा आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव होते. ती पुण्यातील वडाचीवाडी येथे कुटुंबीयांसोबत राहत होती. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिचे वडील प्रवीण रघुनाथ जरांडे यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर तिचा नवरा, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काळेपडळ पोलिसांनी प्रवीण जरांडे यांच्या फिर्यादीनुसार वैष्णवीचा नवरा ओंकार संजय गिसरे (वय २८ वर्षे), सासरे संजय महादेव गिसरे (वय ४९ वर्षे) आणि सासू रुपाली संजय गिसरे (वय ४२ वर्षे) यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वैष्णवीचे लग्न ९ मे २०२६ रोजी ओंकार गिसरे याच्याशी झाले होते. विवाहावेळी माहेरच्यांनी सुमारे ४५ लाख रुपये खर्च करून १० तोळे सोने दिले होते. त्यानंतरही कार खरेदीसाठी पाच लाख रुपयांची मागणी तिच्या सासरच्यांकडून केली जात होती. त्यासाठी वैष्णवीचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. याच कारणामुळे वैष्णवीने आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळ'च्या निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर १० राऊंड फायरिंग; 2 जण गंभीर जखमी, सिनेसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT