INDAPUR OPPOSITION LEADER ANIL PAWAR ATTACKED WITH CHOPPER OUTSIDE MUNICIPAL OFFICE 
मुंबई/पुणे

Pune Crime: नगरपरिषद कार्यालयाबाहेरच विरोधी पक्षनेत्यावर चाकू आणि चॉपरनं जीवघेणा हल्ला

Attack On Opposition Leader: इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर नगरपरिषद कार्यालयाबाहेर चार अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

Bharat Jadhav

  • इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेत्यावर नगरपरिषद कार्यालयाबाहेर जीवघेणा हल्ला.

  • चार अज्ञात हल्लेखोरांनी चॉपर आणि चाकूने हल्ला केला.

  • प्रसंगावधान राखल्यामुळे अनिल पवार यांचा जीव थोडक्यात बचावला.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल अण्णा पवार यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. नगरपरिषद कार्यालयाबाहेरच त्यांच्यावर हल्ला झाला. नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असतानाच चार अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर चॉपर आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हातावर वार झाला असून प्रसंगावधान राखल्यामुळे ते थोडक्यात बचावले. पवार यांच्यासह वसीम शेख हेही जखमी झालेत.

याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत हल्ला प्रकरणात तपास केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासले जात आहेत. हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्या मागील नेमके कारण काय याचा पोलीस तपास सुरू आहे.

अनिल पवार यांना वाचवण्यासाठी वसीम शेख हे धावून आले होते,तेही हल्ल्यात जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT