Pune Crime News  Saam Digital
मुंबई/पुणे

Pune News: गोध्रा हत्याकांडातील आरोपीचे पुणे, नाशिक कनेक्शन, परोलवर बाहेर येत केले १६ गंभीर गुन्हे

Godhra Case: ग्रोधा हत्याकांडात जन्मठेप झालेल्या आरोपीने कारागृहातून पॅरोल मिळवून पुणे गाठले. पुणे आणि नाशिक जिल्ह्यात साथीदारांच्या मदतीने त्याने तब्बल १६ गंभीर गुन्हे केलेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

गोध्रा हत्याकांड प्रकरणातील ११ व्या मुख्य आरोपीला आळेफाटा पोलिसांनी अटक केली होती. मागच्या पाच महिन्यापूर्वी सात दिवसांच्या संचित रजेवर बाहेर आल्यानंतर हा आरोपी फरार झाला होता. या आरोपीवर लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे, नाशिक जिल्ह्यात १६ गुन्हे उघड झाले आहेत. या आरोपीकडून १४ लाख ५० हजारांचा ऐवज पुणे ग्रामीण पोलिसांनी जप्त केला

ग्रोधा हत्याकांडात जन्मठेप झालेल्या आरोपीने कारागृहातून संचित रजा म्हणजे पॅरोल मिळवून पुणे आणि नाशिक जिल्ह्यात साथीदारांच्या मदतीने वाहनचालकांना अडवून लुटमारीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी गोध्रा हत्याकांडातील आरोपीसह त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना देखील अटक केली. या टोळीने आळेफाटा, मंचर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून १४ लाख ४१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

याप्रकरणी सलीम उर्फ सलमान युसूफ जर्दा (वय ५५ वर्षे), साहिल हनीफ पठाण (वय २१ वर्षे), सुफीयान सिकंदर चँदकी (वय २३ वर्षे) आयुब इसाग सुनठीया (वय २९ वर्षे), इरफान अब्दुलहामीद दुरवेश (वय ४१ वर्षे) यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी गुजरातच्या गोध्रा येथे राहतात. आरोपी सलीम जर्दा हा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

कारागृहातून तो संचित रजा मिळवून तो बाहेर पडला. त्यानंतर तो कारागृहात परतला नाही. फरार झाल्यानंतर आरोपी सलीम जर्दाने साथीदारांशी संगनमत करुन घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. आळे फाटा परिसरात या टोळीने एका टेम्पोचालकाला लुटले होते. टेम्पोतील टायर ट्यूब चोरून आरोपी पसार झाले होते. या टोळीविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत. वाहनचालकांना अडवून लूटमार करत होते. आळेफाटा पोलिसांनी तपास करत या आरोपींना अटक केली. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT