Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: कुख्यात गुन्हेगार हिरव्या, डड्याचा राडा; घरात घुसून एका कुटुंबाला दिली जिवे मारण्याची धमकी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अक्षय बडवे)

पुणे : शहरात दहशत माजवण्याच्या घटना दररोज घडतायेत. शहरातील सहकारनगरात देखील अशी घटना घडलीय. येथील एका घरात घुसून तीन आरोपींनी त्या घरातील कुटुंबाला मारहाण करत त्यांना संपवण्याची धमकी सराईत गुन्हेगारांनी दिलीय. हिरव्या आणि डड्या नावाच्या गाव गुंडांनी कोयत्याने मारहाण करत राडा घातलाय. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या कुटुंबाला दमदाटी करणं आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. राजू संजय लोंडे उर्फ डड्या, राज रवी वाघमारे उर्फ हिरव्या आणि सुशिल गोरे, अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. राजू आणि राज हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांनी तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यात या घटनेत गुनाजी वाघमारे गंभीर जखमी झालेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, सहकारनगरमध्ये वास्तव्यात असलेल्या गुनाजी वाघमारे याचे कुटुंब राहते. मंगळवारी रात्री घरात तीन गुंड वाघमारे यांच्या घरात घुसले. त्यांनी तक्रारदार गुनाजी वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर परिसरात कोयते हवेत दाखवत दहशत माजवली. त्यामुळे नागिरकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. इतकेच नव्हेतर या आरोपींनी तेथील नागरिकांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

कोणी पोलिसांत तक्रार केल्यास कुटुंबाला जगू न देण्याची धमकी या आरोपींनी दिली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू आणि राज हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. राजू लोंडे याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. तर राज वाघमारे याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांची मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांना गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी प्राप्त झालेल्या तकारीच तांत्रिक विश्लेषण करून, जे चोरी झालेले मोबाईल ऍक्टिव्ह झाले आहेत. अशा ऍक्टिव्ह झालेल्या मोबाईलना अमरावती, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, बीड जालना, औरंगाबाद, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून जप्त केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT