PUNE FIRING CASE: GUNSHOTS AT H VIKAS STEEL OFFICE, LAWRENCE BISHNOI GANG LINK CLAIMED  Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यातील स्टील व्यापाऱ्याला ५ कोटींची खंडणी... अन् बिश्नोई गँगचा गेम उलटला; राजस्थानमधून मुख्य आरोपी गजाआड!

Pune Crime Branch arrests Bishnoi gang member from Rajasthan : पुण्यातील मंतरवाडी गोळीबार आणि ५ कोटींच्या खंडणी प्रकरणात पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई. राजस्थानमधून बिश्नोई गँगच्या संशयित सदस्याला अटक करण्यात आली.

Akshay Badve

Lawrence Bishnoi Gang : पुण्यातील मंतरवाडी भागात झालेल्या गोळीबार आणि कोट्यवधींच्या खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला (Crime Branch) मोठे यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी थेट राजस्थानमध्ये जाऊन धडक कारवाई केली. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या एका सक्रिय सदस्याला ताब्यात घेतले आहे.

राजस्थानच्या हनुमानगडमधून आरोपी जेरबंद

मिळालेल्या माहितीनुसार, पवन राम असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राजस्थानमधील हनुमानगड येथून त्याला बेड्या ठोकल्या.

ताब्यात घेण्यात आलेल्या पवन राम याच्याकडे आता पोलीस कसून चौकशी करत असून, या गुन्ह्यात बिश्नोई गँगचे आणखी कोणते सदस्य सामील आहेत आणि याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

पुण्याच्या मंतरवाडी परिसरात एक प्रसिद्ध स्टील गोडाऊन आहे. या गोडाऊनच्या मालकाकडे बिश्नोई गँगच्या वतीने तब्बल ५ कोटी रुपयांची अवाढव्य खंडणी मागण्यात आली होती. खंडणीसाठी दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने, दोन आठवड्यांपूर्वी बिश्नोई गँगच्या दोन साथीदारांनी मंतरवाडी येथील स्टील गोडाऊनवर येऊन हवेत गोळीबार केला होता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. या गोळीबारानंतर पुणे पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.

१८ जून रोजी पुणे शहरातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे एका व्यावसायिकाच्या ऑफिसवर गोळीबार झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. 18 जून रोजी रात्री ९ वाजता घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. विशेष म्हणजे, या गोळीबारानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाला.

संबंधित स्टील व्यवसायिकाकडून तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी या टोळीतील सदस्यांनी मागितली होती तसेच त्या व्यावसायिकाच्या इतर भागीदारांना सुद्धा पाच कोटी रुपये द्यावे लागतील अशी धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बिश्नोई टोळीतील सदस्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकं या दोन तरुणांचा शोध घेत होते. दोन दिवसातच या घटनेत वापरलेली दुचाकी सासवड भागात एका निर्मनुष्य ठिकाणी मिळून आली. जादूचा की वरचा नंबर खोडून टाकण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहिती द्वारे पुणे पोलिसांच्या पथकाला संबंधित तरुण हा राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान गाठत यातील एका तरुणाला ताब्यात घेतलं असून दुसऱ्या तरुणाचा शोध सध्या सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

SCROLL FOR NEXT