Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना! भाजप नेत्याने केली महिलेची हत्या, विवाहबाह्य संबंधातून भयंकर कृत्य

Pune News : पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमसंबंधांच्या संशयातून ३९ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या. वकील, त्याची पत्नी आणि मुलगी अटकेत; सहा तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला.

Alisha Khedekar

  • पुण्यातील चंदननगरमध्ये ३९ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या

  • प्रेमसंबंधांच्या संशयातून गुन्हा घडल्याचा आरोप

  • वकील, पत्नी आणि मुलगी अशा तिघांना अटक

  • सहा तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला

  • नातेवाईक न्यायाच्या मागणीसाठी आक्रमक

सागर आव्हाड, पुणे

पुण्यात कथित प्रेमसंबंधांच्या संशयावरून एका ३९ वर्षीय महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना पुण्यातील चंदननगर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांसह गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांत वकील, त्याची पत्नी आणि मुलगी या तिघा आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा भाजपचा कायदे विभागाचा अध्यक्ष आहे. पूनम दिनेश मून असे मृत महिलेचे नाव आहे, तर ॲड. संजय सावंत असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान मृत महिलेचे नातेवाईक आक्रमक होत चंदन नगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम मून आणि संजय सावंत यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय सावंत यांच्या कुटुंबाला होता. याच संशयातून ॲड. सावंत याची पत्नी स्वाती आणि मुलीने संगनमत करून पूनमच्या हत्येचा कट रचला.

चंदननगर येथील कार्यालयात आरोपींनी पूनम यांचे पाय दोरीने बांधून बॅटने आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या कटात वकील संजय सावंत याचाही सहभाग आहे. याप्रकरणी पूनम यांचे पती दिनेश उद्धवराव मून यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संजय सावंत आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेतले. तर, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने स्वाती सावंत हिला ताब्यात घेतले.

या तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नातेवाईक आक्रमक झाले असून चंदन नगर पोलीस स्टेशन बाहेर जमले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पूनमची बॉडी ताब्यात घेणार नाही असं नातेवाईकांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT