पुण्यामध्ये बुधवारी भयंकर घडना घडली. शिवाजीनगर कोर्टाबाहेर मंदार किवळे या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या तरुणावर आधी गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदारवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली. आज दुपारी सहाही आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात झालेल्या हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांनी सहा आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. आज दुपारी या आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे. पूर्व वैमनस्यातून या सर्व आरोपींनी मंदार किवळेवर हल्ला केला. अक्षय सुभाष चव्हाण (२० वर्षे), अमोल रामचंद्र चव्हाण (४८ वर्षे), स्वप्निल बाजीराव गवळी (२८ वर्षे), ओंकार संतोष पवार (१८ वर्षे), सूरज साधू मालेकर (२२ वर्षे) अशी आरोपींची नावं आहेत. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवाजीनगर कोर्ट परिसरात झालेल्या हल्ल्या प्रकरणात पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतर २ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.