pune news  saam tv
मुंबई/पुणे

Husband wife Clash solved: घरात एकत्र राहायचे, पण स्वयंपाक वेगळा करायचे; अखेर 5 वर्षांनी नवरा-बायकोचा मिटला वाद

Husband wife Clashes news: अनेकदा नवरा-बायकोचे वाद लगेचच मिटतात. तर काही वेळा ते विकोपालाही जातात. यातून पुढे प्रकरण कोर्टातही पोहोचतं. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे.

Vishal Gangurde

Husband wife solved after 5 years:

नवरा बायकोमध्ये वाद होणं, ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकतांना दोघांमध्ये वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेचच मिटतात. तर काही वेळा ते विकोपालाही जातात. यातून पुढे प्रकरण कोर्टातही पोहोचतं. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

पुण्यातील एका जोडप्याने कौटुंबिक वादातून पाच वर्ष बोलणं थांबवलं होतं. दोघांमध्ये अबोला निर्माण झाल्याने स्वतंत्रपणे स्वयंपाक करत होते. गेल्या पाच वर्षात या जोडप्याने एका शब्दाचाही संवाद साधला नव्हता. मात्र या जोडप्याचा शनिवारी लोकअदालतीमध्ये वाद मिटला. या दोघांना समुपदेशामध्ये समजावून सांगण्यात आलं. हे जोडपं वाद विसरून पुन्हा एकत्र आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाद विकोपाला गेला अन् पत्नीने कोर्टात धाव घेतली

या जोडप्यामध्ये कौटुंबिक वाद झाल्याने पत्नीने कोर्टात धाव घेतली होती. पत्नीने पतीविरोधात कौटुंबीक दावा दाखल केला होता. या दाव्यानंतर हे प्रकरण लोकअदालतमध्ये पोहोचलं होतं. अशोक आणि लक्ष्मी (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. अशोक हे सैन्यातून निवृत्त झाले आहेत. तर लक्ष्मी या गृहिणी आहेत.

कोर्टात अशोक यांची बाजू अॅड. सचिनकुमार गेलडा यांनी मांडली. तर लक्ष्मी यांच्या बाजूने अॅड. अनिलकुमार जाधव यांनी आपली बाजू मांडली. पती व्यवस्थित पालनपोषण करीत नाही, असा आरोप पत्नी लक्ष्मी यांनी केला. याच कारणामुळे गेल्या पाच वर्षांत या जोडप्यांमध्ये खटके उडत होते. एकमेकांशी बोलत नव्हते आणि आपापला स्वयंपाकही वेगवेगळा करत होते.

अन् पत्नीने केली पोटगीची मागणी

दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर लक्ष्मी यांनी फेब्रुवारी महिन्यात पतीविरोधात दावा दाखल केला. पतीने दरमहा पोटगी द्यावी, अशी मागणी पत्नीने केलेल्या दाव्यात केली होती. त्यानंतर हा दावा लोकअदालतमध्ये ठेवण्यात आला. यावेळी दोघांमध्ये यशस्वी समुपदेशन झाले. पतीने दरमहा पत्नीला आठ हजार रुपये द्यायचे. तसेच तिच्या आवश्यक बाबींसाठीही पैसे द्यायचे आणि तिचा व्यवस्थित सांभाळ करायचा, या सर्व अटींवर हे प्रकरण निकाली निघालं आहे.

आता उतार वयात दोघांनाही ऐकमेकांची गरज आहे. उर्वरित आयुष्य दोघांनीही गुण्यागोविंदानं घालवावं, असं दोघांनाही समुपदेशात सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता हे जोडपं हा वाद विसरले आहे. या दोघांनीही नव्याने जगण्यास सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT