Pune Corona Cases Update: पुणे : देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं बोललं जात आहे. कारण, दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. तर आज दिवसभरात पुन्हा ही रुग्णसंख्या वाढली आहे. पुण्यात दिवसभरात 2284 जण कोरोना पॅाझिटीव्ह आढळून आले आहेत. तर पुणे जिल्ह्यात 3 हजार 648 नवे कोरोनाबाधित त्यामुळे चिंता वाढली आहे. (Pune Corona Cases Update 3648 New Corona Cases In Last 24 Hours)
तर पुण्यात दिवसभरात रुग्णांना 80 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे (Pune) शहरात करोनाबाधित 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील 01, अशा एकूण 04 जणांची मृत्यू झाला आहे. तर 106 जण ॲाक्सिजनवर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आजच्या आकडेवारीनंतर पुण्यात एकूण कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रूग्णसंख्या ही 516787 वर येऊन पोहोचली आहे. सध्या पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 7665 इतकी आहे. तर एकूण मृत्यू 9122 आहे. आजपर्यंत 499991 जण कोरोनातून बरे झाले आहेत. आज 15,775 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.