2 girl Physically Assaulted By School Bus Driver Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील चिमुकलींवरील अत्याचाराची घटना कशी उघड झाली? आईनं तक्रारीत नेमकं काय सांगितलं?

Priya More

पुण्यातील वानवडीमध्ये दोन शाळकरी मुलींवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे पुण्यामध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी स्कूल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेवरून राजाकारण देखील तापले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. ही संपूर्ण घटना कधी आणि कशी घडली, मुलींच्या आईने तक्रारीमध्ये काय म्हटले आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात एक एक अपडेट समोर येत आहे. २ अल्पवयीन मुलींच्या आईंनी पोलिसात तक्रार दिली आहे. आरोपीने मुलींच्या प्रायव्हेट पार्टला टच केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. वानवडीतील घटनेवर पोलिस उपायुक्त ए. राजा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'स्कूल बसमध्ये महिला मदतनीस होती का याचा तपास पोलिस करत आहेत. स्कूल बस शाळेची होती की भाडेतत्त्वावर घेतलेली याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात नियमांचे उल्लंघन झालं का? याचा तपास देखील पोलिस करत आहेत. शाळा प्रशासनाशी संपर्क सुरू आहे. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. चाईल्ड वेल्फेअर कमिटी समोर सर्वांचे जबाब होणार आहेत.'

या घटनेनंतर वरीष्ठ पोलिस आधिकारी वानवडी पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. ⁠सहपोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. ⁠दोन लहान मुलींवरील अत्याचाराची पुणे पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. बुधवारी पिडीत मुलींच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात तत्कार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. ज्या स्कूल व्हॅनमध्ये घटना घडली ती देखील पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'अल्पवयीन मुलीच्या बाबत कुठलाही अन्याय सहन करून घेतला जाणार नाही. अशा प्रवृत्तींना अक्षय शिंदेसारखी शिक्षा दिली पाहिजे. लहान मुलींवर अन्याय होत असतील तर विरोधकांनी त्याचं राजकारण करू नये. अशा प्रवृत्तींना ठेचून मारलं पाहिजे. पुण्यातच अशा तीन घटना घडलेल्या आहेत. वानवडीतील घटनेत शाळेने पूर्ण चौकशी केली पाहिजे कारण शाळा फी घेते. लैंगिक अत्याचाराबाबत विरोधकांनी राजकारण करू नये.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : महायुतीत एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम?

Railway Employees Bonus 2024: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्राने बोनस केला जाहीर; मिळणार 'इतकी' रक्कम

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

SCROLL FOR NEXT