Pune Chandni Chowk flyover Chhatrapati Shivaji Maharaj name demand for Sambhaji Brigade Saam TV
मुंबई/पुणे

Pune Chandani Chowk: चांदणी चौकातील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

Pune Chandani Chowk News: चांदणी चौकातील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Chandani Chowk News: पुणेकरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला राज्यातील प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने पुणे शहरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. दरम्यान, या सोहळ्याआधीच उड्डाणपुलाच्या नावावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

कारण, चांदणी चौकातील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. पुण्याची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. १२ मावळातील सर्व मावळे सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.

"मावळ्यांच्या कर्तुत्वाचा इतिहास पुण्यासह महाराष्ट्राने, देशाने पाहिला आहे. अशा कर्तुत्वान राजाचा, छत्रपतींचा इतिहास हीच पुण्याची ओळख आहे. म्हणून चांदणी चौकाला अर्थात चांदणी चौकातील उड्डाण पुलाला 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचे नाव द्यावे", संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन होणार आहे.

या पुलाला कुणाचेही नाव देण्यात आलेलं नाही. त्यामुळे एक शिवप्रेमी मावळे म्हणून आमची विनंती आहे की, या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन शिवरायांच्या विचारांचा गौरव करावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी व महाराष्ट्र सरकारकडे लेखी पत्र देऊन पाठपुरावा करणार आहोत, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

Aadhar Card : खुशखबर! आता आधार अ‍ॅपवर क्षणात नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

Dahi Kachori Recipe: नाश्त्याला बनवा खुसखुशीत दही कचोरी; १० मिनिटांत बनेल अशी रेसिपी

SCROLL FOR NEXT