Team India News 
मुंबई/पुणे

Pune : दुबईत टीम इंडियाचा विजय, पुण्यात राडा; तरूणावर चाकू अन् दगडाने वार

Team India News : पुण्यातील जंगली महाराज रोडवर झालेल्या जल्लोषाच्या वेळी टोळक्याने एका तरुणावर चाकू, दगड, आणि बेल्टने हल्ला केला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Pune crime News : न्यूझीलंडचा ४ विकेटने पराभव करत भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. रोहित शर्माच्या संघाने दुबईत विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात आला. पुणे, मुंबई, रायगड, नाशिकसह राज्यभरात चाहत्यांनी सेलीब्रेशन केलं. पण याच सेलीब्रेशनला गालबोट लागले आहे. पुण्यामध्ये टोळक्याने राडा घातल्याचे समोर आलेय. टीम इंडियाच्या विजयी जल्लोषावेळी टोळक्याने एका तरूणावर चाकून सपासप वार केल्याची घटना घडली आहे.

टीम इंडियाच्या विजयाचे सेलीब्रेशन करताना पुण्यात टोळक्याकडून राडा घालण्यात आला. जल्लोष करताना टोळक्याकडून एका तरुणाला चाकूने मारहाण करण्यात आली. पाच ते सहा जणांकडून एका तरुणाला बेदम मारहाण झाली. या मारहाणीत तरूण गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील जंगली महाराज रोड जवळ रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका तरूणाला जबर मारले. चाकूने, बेल्ट आणि दगडाने तरुणाला मारहाण झाली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

पुण्यात विजयी जल्लोष -

भारताने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली. भारताने विजय मिळवताच सगळ्या देशात हा विजय साजरा झाला, याला पुणे सुद्धा अपवाद नव्हतं. पुण्यातील फर्गुसन रोड वर तरूणांनी जल्लोषात विजय साजरा केला. विराट कोहली, रोहित शर्माचे पोस्टर हातात घेऊन टीम इंडियासाठी हजारोंच्या संख्येने क्रिकेट प्रेमींनी एफसी रोडवर गर्दी केली होती. फटाके फोडून, ढोल ताशा वाजवत हा जल्लोष करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT