Uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Udhav Thackeray: 'गद्दारांशी लढा देण्यासाठी जनता माझ्यासोबत..' उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंवर जोरदार हल्लाबोल; भाजपवरही साधला निशाणा

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मतदारांना ऑनलाईन आवाहन केलं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune By Election: राज्याच्या राजकारणात सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली असतानाच प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडीकडून अजित पवार, आदित्य ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

यावेळी चिंचवडमधील नाना काटे यांच्या प्रचारार्थ अजित पवार, आदित्य ठाकरे यांची जाहीर सभ झाली. या प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ऑनलाईन संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

काय म्हणाले उद्धव ठाकरे...

ठचिंचवड आणि कसबा निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची ही इच्छा होती, मात्र सध्या लोकशाही मध्ये तशी मोकळीक राहिली नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटूंबातील उमेदवारी न देण्यावरुन जोरदार टीका केली.."

यावेळी बोलताना "गिरीश बापट हे गंभीर आजारी असताना त्यांना प्रचारात आणले गेले. मी त्यांचे फोटो पाहिले, ऑक्सिजनच्या नळ्या नाकात टाकून त्यांना प्रचारात उतरवलं. हा अमानुषपणा कुठला, ही कुठली लोकशाही?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना "मुंबई महापालिकेतील कामाची चौकशी करत आहात तर कराच, पण पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराचीही चौकशी करा," असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयावरुनही त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

"तुम्ही आमचा धनुष्यबाण चोरला आहे, पण आमच्याकडे मशाल आहे. तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन येतो, मग बघू. पण सध्या कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या," असं आवाहन त्यांनी केलं. (Udhav Thackeray)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

"तू xxx@# आहेस... तू आम्हाला मानत नाही का..?" शेतावरून वाद, तरूणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

New Bride Tips: नव्या नवरीने घरसंसार सांभाळताना टाइम मॅनेजमेंट कसं करावं?

Famous Actor Arrested : प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; कंपनीला घातला ५ कोटींचा गंडा, ७ वर्षांपासून होता गायब

Jowar Flour Recipe : ज्वारीच्या पिठाचा हा पदार्थ कधी खाल्लाय का?

SCROLL FOR NEXT