Avinash Bhosale Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही CBIकडून जप्त

सीबीआयने पुण्यातील अविनाश भोसले यांच्या घरातून ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयकडून(CBI) पुन्हा धक्का बसला आहे. भोसले यांचे हेलिकॉप्टर काल सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे. अविनाश भोसले येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात अटकेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सीबीआय भोसले यांची चौकशी करत आहे.

अविनाश भोसले हे पुण्यातील बांधकाम व्यवसायातील मोठे नाव आहे. ते सध्या अटकेत आहेत. डीएचएफएल आणि येस बँकेशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने (CBI) अविनाश भोसले यांना अटक केली आहे. याआधी सोमवारीच सीबीआयने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

अविनाश भोसले यांना २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येस बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, "सीबीआय'कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात "सीबीआय'ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती. अविनाश भोसले हे वाधवान बंधूंचे अत्यंत जवळचे मानले जातात. या घोटाळ्याच्या पैशातून हे हेलिकॉप्टर खरेदी केल्याच्या संशयावरून सीबीआयने आज हे हेलिकॉप्टर ताब्यात घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

Saif Ali Khan: 'हल्लेखोराकडे एक नाही तर दोन चाकू...'; ८ महिन्यांनंतर सैफ अली खानने केला त्या रात्रीचा धक्कादायक खुलासा

Air Purifying Plants: प्रदूषणाने त्रस्त आहात? तर घरात लावा ही 5 झाडे, हवा राहील शुद्ध

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड – चाकण वाहतूक कोंडी मोर्चा

SCROLL FOR NEXT