pune bus fire  saam tv
मुंबई/पुणे

Pune Bus Fire : पुण्यातील चांदनी चौकाजवळ बसला भीषण आग; अग्निशमन दलाची २ वाहनं घटनास्थळी

पुण्यातील कोथरूड, चांदनी चौकाच्या पुढे एका बसला आग लागल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

Pune Bus Fire : पुण्यातून आगीच्या घटनेचं वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील कोथरूड, चांदनी चौकाच्या पुढे एका बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे २ वाहने रवाना झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूडजवळी चांदनी चौकाच्या पुढे मारणेवाडीच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीच वृत्त मिळताच अग्निशमन दलाची २ वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बसला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मारणेवाडीच्या बसला आग लागल्याने रस्त्यावर एकच खळबळ उडाली. बस आग लागल्यानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे जीव वाचले. या आगीमुळे चांदणी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT