PABE GHAT ACCIDENT: TWO TOURISTS KILLED AS RAJGAD-BOUND MINIBUS FALLS INTO RAVINE Saam Tv
मुंबई/पुणे

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Pune Mini Bus Accident Update News : राजगड पर्यटनासाठी निघालेल्या अंधेरीतील पर्यटकांच्या मिनी बसचा पाबे घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Alisha Khedekar

  • राजगड पर्यटनासाठी निघालेल्या अंधेरीतील पर्यटकांच्या मिनी बसचा अपघात

  • बस सुमारे 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू

  • अनेकजण जखमी झाले असून उपचार सुरु

सागर आव्हाड, पुणे

Pune Rajgad Fort Mumbai Tourist Bus Accident News किल्ले राजगडावर पर्यटनासाठी निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा पाबे घाटात भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली. या अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चालकासह काही पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी परिसरातील सुमारे २० जणांचा पर्यटकांचा गट किल्ले राजगडावर पर्यटनासाठी रवाना झाला होता. पहाटेच्या सुमारास मिनी बस पाबे घाटातून प्रवास करत असताना एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे २० ते २५ फूट खोल दरीत कोसळली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. काही जखमी प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते.

स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकाच्या मदतीने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर चालकासह काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघातानंतर दरीत कोसळलेली मिनी बस बाहेर काढण्यासाठी जेसीबी यंत्राची मदत घेण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर वाहन दरीतून बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महावितरणला अदानी पॉवरकडून स्वस्त वीज खरेदीस एमईआरसीची मंजुरी

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

मुंबईकरांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेवर धावणार १२ नव्या AC लोकल; वेळापत्रक पाहिलेत का?

नाश्त्याला रव्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 5 पदार्थ, न खाणारेही खातच राहतील

SCROLL FOR NEXT