Varandha Ghat Traffic Closed Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: ब्रेकिंग! वरंध घाटात रस्त्यावरच पोलिसांनी टाकले मोठमोठे दगड, वाहतुकीसाठी मार्ग बंद

Rohini Gudaghe

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

राज्यात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळण्याची भीती असते. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंध घाटात अशीच दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जातेय. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाट रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय.

वरंध घाटातील वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद

याच पार्श्वभूमीवर या मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलाय. मात्र, तरी सुद्धा काही वाहनचालक जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून ये-जा करत (Pune News) आहेत. त्यामुळे प्रशासनाने रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने मोठेमोठे दगड आणि बॅरिगेट्स लावून रस्ता बंद केलाय. पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्यानं खबरदारी म्हणून रायगड प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय.

वरंध घाटात दरड कोसळण्याची भीती

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट मार्गावर मोठमोठ्या दगड टाकून रस्ता बंद केल्याचं समोर आलंय. रायगड आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी 'घाट बंद'ची अधिसुचना काढून देखील प्रवासी आणि मालवाहू गाड्यांकडून घाट रस्ताचा वापर सुरु (Varandh Ghat Traffic) होता. त्यामुळे प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. मुसळधार पावसादरम्यान दरड कोसळून दुर्घटना घडण्याच्या पार्श्वभुमीवर सुरक्षिततेचा उपाय योजना वरंध घाट रस्ता बंद करण्यात आलाय.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर

धोकादायक घाट रस्त्याचा वापर केला जाऊ नये यासाठी, प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर (Heavy Rain) आलीय. मोठमोठे दगडी रस्तात टाकून प्रशासनाने घाट रस्ता बंद केलाय. घाट रस्ता बंदीचे फलक देखील लावले गेले आहे. रस्त्यावर दरड कोसळून (Landslide Possibilty) अपघात होवू नये, यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत असल्याचं दिसत आहे. रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. आज रायगडमध्ये दिवसभर पाऊस कोसळत आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची संधी; मिळणार ७५००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Raj Thackrey :''.. मग आधी पालिका निवडणुका घ्या!'', राज ठाकरेंची पोस्ट

IPL 2025 Auction: IPL 2025 स्पर्धेचं ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार? मोठी अपडेट आली समोर

Pant vs Litton Das: भाई, मला का मारतोय? भर मैदानात पंत-लिटन दासमध्ये राडा, नेमकं काय घडलं, पाहा Video

SCROLL FOR NEXT