Pune Police  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Breaking News: पाच कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलीस दलात खळबळ, काय आहे प्रकरण?

Pune Police News: दोन दिवसांपूर्वी शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकावणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलीस दलातील ५ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी|ता. १३ फेब्रुवारी २०२४

Pune Crime News:

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकावणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच आता मोठी बातमी समोर आली असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलीस दलातील ५ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी शरद मोहोळ (Sharad Mohol) याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली होती. यावेळी पोलीस शिपाई निखिल पासलकर आणि पोलीस शिपाई पोपट खाडे हे दोघे ही सायबर पोलीस विभागात कार्यरत होते.

याच २ पोलीस कर्मचाऱ्यांच्या रखवालीतून मार्शल लीलाकर या आरोपीने पळ काढला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कर्तव्यात कसूरी केल्याचा ठपका ठेवत या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसऱ्या प्रकरणात, काही दिवसांपूर्वी पुण्यातील मगरपट्टा पोलीस चौकीत एका महिलेला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता पोलीस दलातील ३ जणं दोषी असल्याचे आढळून आले. यामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मगरपट्टा पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या एक अधिकारी आणि २ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT