Chhatrapati Sambhajinagar News: ब्रेकिंग! आश्रम शाळेतील ९० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा, उपचार सुरू, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Food Poisoning: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.
food poison news
food poison newsSaam TV
Published On

Chhatrapati Sambhajinagar News:

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांनावैद्यकीय उपचारासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात. या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 317 असून आज दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना आश्रम शाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते.

हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारख्या त्रास जाणवू लागल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती. संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने 96 विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आल्यावर सलाईन देण्यात आली तसेच औषधोपचार सुरू आहेत.

food poison news
Maharashtra Politics: पक्ष सोडणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही; काँग्रेस प्रभारींचा अशोक चव्हाणांवर संताप; नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, याप्रकरणावरुन आम आदमी पार्टीचे प्रदेश युवा संघटनमंत्री सतीश देवेंद्र लोखंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा सुरू झाल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकार पळवा पळवी करण्यात व्यस्त असून या ठिकाणी विद्यार्थ्यांवर देखरेख करण्यासाठी कुठेही भक्कम यंत्रणा नाही. गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. जे जबाबदार असतील त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कार्यवाही करावी. नसता आम आदमी पार्टीच्या वतीने जाब विचारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

food poison news
Shivaji Maharaj Jayanti: न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात घुमणार ‘शिवबाचं नाव’, शिवप्रेमींमध्ये भरणार ऊर्जा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com