Beed Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई! एकाचवेळी ६५ गुंड जिल्ह्यातून हद्दपार

Pune Latest News: हडपसर, वानवडी भागातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे...

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. शहरात कोयता गॅंगने दहशत माजवली असून खून, मारामाऱ्यांसारखे गंभीर गुन्हे उघडकीस येत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी पुणे पोलिसांनीही कारवाई सुरू केली असून पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी विविध एकाच वेळी ६५ गुंडांना पुणे शहर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. 

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसर, वानवडी भागातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यात आली. या सर्वांविरोध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये (हद्दपार) कारवाई करण्यात आली. गुंडांना पुणे शहर, जिल्हा, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायु्क्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त शाहूराजे साळवे, अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण काळे, आश्लेषा माने आदींनी ही कारवाई केली. एकाच वेळी ६५ गुंडांना हद्दपार करण्यात आल्याने गुंडांना जरब बसणार आहे.

पुणे पोलिसांकडून धिंड पॅटर्न..

दरम्यान, या आधी पुणे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी धिंड मोहीम सुरू केली होती. ज्या भागात गुन्हेगारांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच भागातून त्यांची वरात काढण्याचा धडाका पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांच्या या कारवाईने पुणेकरांनीही स्वागत केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT