Drug mafia Lalit Patil health deteriorated treatment started at Sassoon hospital Saam TV
मुंबई/पुणे

Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट: पोलिसांकडून ससूनच्या कर्मचाऱ्यासह कॉन्स्टेबलला अटक

Lalit Patil Case: ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. रात्री उशिरा ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवतेला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली असून एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

Lalit Patil Case Update:

राज्यात सध्या ललित पाटील प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. ललित पाटीलने पलायन केल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालय चौकशीच्या फेरीत अडकल्याचे दिसतेय. काल रात्री उशिरा ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवतेला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली असून एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवतेला पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणील आणखी एक मोठी कारवाई केली असून कारागृहातील पोलिस कर्मचारी मोईज शेख याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या दोघांना एक डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, ससूनमधून (Sasoon Hospital) ललित पाटीलने पलायन केल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे तसेच कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी या प्रकरणी शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते.तसेच या प्रकरणात ससूनच्या डीनवरही कारवाईची मागणी करण्यात आली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT