Pune FTII News
Pune FTII News Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यातील FTII मध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव -

पुणे : पुण्यातील (Pune) एफटीआयआय ( फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ टेलिव्हिजन) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस (Deccan Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या 'एफटीआय'मध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली.

पाहा व्हिडीओ -

त्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशनचे (Deccan Police Station) मार्शल घटनास्थळी दाखल झाले. अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो एफटीआयआय मधील बॉईज हॉस्टेलमध्ये राहत होता.

आज सकाळी नऊ वाजता त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. अश्विन शुक्ला हा मुळचा गोवा येथील रहिवासी आहे. एफटीआयआयमध्ये तो शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anita Date : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेने खरेदी केली नवी कोरी गाडी; अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Pune News: रणरणत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; चोरट्यांनी २३ लाखांची बॅग पळवली, पुण्यातील घटना

Children Lunch Box : लहान मुलांना दुपारच्या जेवणात द्या 'हे' स्वादिष्ट पदार्थ; १० मिनीटांत ताट करतील रिकामं

Mumbai News : कर्जाचे हफ्ते थकलेल्या वाहनाची परस्पर केली विक्री; व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्रातील कारागृहांत चाललंय तरी काय? कळंब्यात पुन्हा 10, भंडा-यात 1 मोबाईलसह बॅटरी जप्‍त

SCROLL FOR NEXT