Pune PDCC Bank  social media
मुंबई/पुणे

Pune PDCC Bank: ब्रेकिंग! पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकाचे निलंबन

Pune Latest News: महत्वाची अपडेट समोर आली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे, ता. ११ मे २०२४

बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या मध्यरात्री पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेल्हे शाखा मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे समोर आले होते. आमदार रोहित पवार यांनी याबाबत व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली होती. याप्रकरणी आता महत्वाची अपडेट समोर आली असून वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ७ मे रोजी बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या आदल्या रात्री पुणे जिल्हा बँक रात्री बारानंतरही सुरू असल्याचे समोर आले होते. आमदार रोहित पवार यांनी याबाबतचे व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली होती.

या प्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली घेत आचार संहिता भंग केल्याप्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. तसेच याप्रकरणाची चौकशी केली असता सीसीटीव्हीमध्ये ४० ते ५० कर्मचारी बँकेच्या आत आढळून आले होते.

त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकाचे निलंबन केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बँकेतून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. रोहित पवार यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : गरीबी आणि संघर्षातून यशाला गवसणी! पालावर राहणाऱ्या सनीने पटकावलं आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक

Smita Gondkar Photos: 'पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्रीचा हॉट अंदाज, फोटो पाहून नजर भिरभिरेल

भाजपात पक्ष प्रवेशाचा धडाका; शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या हाती कमळ

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना संपवण्याचा भाजप–RSSचा कट; ठाकरेंच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Gajar Halwa Recipe: कडाक्याच्या थंडीत बनवा गाजराचा गरमागरम हलवा, लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT