Pune Chakan Latest News: Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: मुलाला शॉक लागला म्हणून आई वाचवायला धावली, माय- लेक दोघांचाही मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना!

Pune Chakan Latest News: विजेचा शॉक लागून माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाकण परिसरात घडली. मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रोहिदास गाडगे

पुणे, ता. १२ जून २०२४

विजेचा शॉक लागून आई- आणि मुलाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना चाकणमधील खराबवाडी येथे घडली. आधी मुलाला शॉक लागल्याने आई मदतीला धावली अन् हा अनर्थ घडला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाकणमधील खराबवाडी येथे घराच्या छतावर वीजेचा शॉक लागुन मायलेकाची जागीच मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. पल्लवी जाजु असे आईचे नाव आहे, तर समर्थ जाजु (वय, १५) असे मृत मुलाचे नाव आहे.

घराच्या छतावर आईसोबत 15 वर्षीय मुलगा छतावर आला होता. यावेळी बाजुला असणाऱ्या पत्र्यामध्ये विद्युत लाईट प्रवाह उतरला. या पत्र्याच्या संपर्कात आल्याने मुलाला शॉक लागला. मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच आई बचावासाठी गेली असताना आईलाही शॉक लागला. यामध्ये १५ वर्षीय मुलासह आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विज कोसळून बैलांचा मृत्यू

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्या नुसार नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात दमदार पाऊस झाला.नांदेडच्या किनवट तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसात किनवट तालुक्यातील कोसमेट येथील एका शेतकऱ्याच्या दोन बैलांवर वीज कोसळली.या घटनेत दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

SCROLL FOR NEXT