Threatening Phone Call  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Mall Bomb Threat: ब्रेकिंग! विमाननगर परिसरातील मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; पुण्यात खळबळ

Pune Breaking News: फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये बॉम्बस्फोट घडवून देण्याची धमकी देणारा ईमेल पाठविण्यात आल्याने एकच घबराट उडाली. याबाबत पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास सुरू करून धमकीचा इमेल पाठविणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड| पुणे, ता. १९ ऑगस्ट २०२४

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या फिनिक्स मार्केट सिटी मॉलला बाँम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मेल पाठवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील विमाननगर भागतील मॉल बॉम्बने उडून देण्याची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये बॉम्बस्फोट घडवून देण्याची धमकी देणारा ईमेल पाठविण्यात आल्याने एकच घबराट उडाली. याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी धमकीचा ईमेल पाठविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मॉलमध्ये हिडनस बोन नावाच्या व्यक्तीने ई-मेल करून मॉल मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. मॉलमधील कोणी वाचू शकणार नाहीत. पोगो आणि नोरो मला त्रास देत आहेत,' असे पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले होते. याबाबत पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास सुरू करून धमकीचा इमेल पाठविणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईमधील वाशीमध्येही असाच प्रकार समोर आला होता. वाशी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली होती. या धमकीनंतर संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला होता. मात्र तपासामध्ये काहीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT